भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील गौतम नगर भागात राहणाऱ्या ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील गौतम नगरातील उमेश रमेश तायडे (वय – ४०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. याप्रकरणी आनंदा तायडे यांच्या खबरीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अन्वर शेख करीत आहे.