जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ते भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक लागून मृत्युमुखी पडलेल्या मयताची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे .
रेल्वेचे सहा.पो.उप निरी राजेश पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ अकस्मात मृत्यू .रजि. नं. २०/२०२२ प्रमाणे ८ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेला आहे. यातील अनोळखी मयत पुरुष रेल्वे स्टेशन जळगांव डाऊन रेल्वे ट्रॅक कि.मी. नं. ४१९/२१ येथे ट्रेन नं. ००७१४ किसान स्पेशल या धावत्या रेल्वे गाडीचा फटका लागुन त्याचे दोन्ही पाय व उजवा हाताला जबर मार लागल्याने अप शेड व डाऊन शेडच्यामध्ये पडुन जागीच मरण पावला आहे.
या मयताचे वारसाचा मयत पुरुषाचे वय अंदाजे ५० / ५५ वर्षे आहे. उंची ५ फुट, अंगाने सडपातळ, रंग गव्हाळ असुन मयताने अंगात तपकिरी, काळ्या-पिवळ्या रंगाचा चौकडीचा फुल बाह्यांचा शर्ट, कमरेला काळ्या रंगाची ट्रॅकसुटची फुलपट असा पेहराव होता. गळ्यात काळ्या पिवळ्या रंगाची लांब मण्यांची माळ घातलेली आहे.
या पुरुषास कोणी ओळखत असल्यास अथवा कोणी नातेवाईक असल्यास रेल्वे पोलीस चौकी, जळगांव येथे सहा.पो.उप निरी, राजेश पुराणिक यांचेशी मो.नं. ९८२३५३७३६७ वर संपर्क साधावा.