जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मराठा क्रिकेट लीगचा समारोप १० एप्रिल रोजी सायंकाळी सहा शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात वक्ते प्रा. नितीन बानुगडे- पाटील हे शिवचरित्रावर व्याख्यान देणार आहेत.
त्या आधीच्या प्रदर्शनीय सामन्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे , जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया,
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी ५५ हातगाड्यांचे वितरण केले जाणार आहे ५१ अभ्यासिकांना पुस्तके दिली जातील.यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा. एकता मराठा
फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा. गोपाल दर्जी यांनी केले आहे.