तोंडापूर ता – जामनेर ( प्रतिनिधी ) – तोंडापूर येथे पहुर पोलिसांच्या वतीने दुपारी पान मसाला , गुटखा बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टपरीधारकावर सपोउनि संजय बनसोड याच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली
जामनेर तालुक्यातील करमाड येथे नुकतीच जामनेर पोलिसांनी तबाखु व पान मसाला गुटखा बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या गाडी पकडून गाडी चालक व मालकावर दोन लाख ६३ हजार तिनशे रुपयांचा गुटखा जप्त करत कारवाई झाल्याने विक्रेत्यांचे धाबे दणानले पहुर पोलिसानी १० एप्रिलरोजी तोंडापूर बसस्थानक परिसरातील टपरीवर पान मसाला , गुटखा विक्री करणाऱ्या पाच दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली एका दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला असल्याची चर्चा सायंकाळी बसस्थानक परिसरात सुरू होती यावेळी पहुरचे पो नि प्रताप इंगळे याच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि संजय बनसोड , पो का ईश्वर देशमुख , विनय सानप ,.झानेश्वर ढाकरे ,.गोपाल ,माळी , पोलिस पाटील जितेंद्र पाटील याच्या पथकाने कारवाई केली त्यामुळे टपरीधारकामध्ये भितिचे वातावरण आहे.
तोंडापूर येथे कार्यवाही करताना उप पोलिस निरीक्षक संजय बनसोड व पोलीस पाटील जितेंद्र पाटील तोंडापूर