चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – फ्लॅट घेण्यासाठी आई-वडीलांकडून दहा लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनी येथील सोनम विनय दुसाने (वय- ३०) या विवाहितेचा विवाह नाशिक येथील विनय प्रकाश दुसाने यांच्याशी झाला.सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली.नंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी आई-वडीलांकडून १० लाख रुपये आणावे न्हणुन पती व सासरच्या सदस्यांकडून शारीरिक व मानसिक छळवणूक केला जात होता
. या त्रासाला कंटाळून सोनम आईवडिलांकडे चाळीसगाव येथे निघून आली . २५ जून २०१९ ते २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत तिला अमानवी वागणूक दिली गेली. नम हिने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून पतीसह सासु- सासरे, दिर, मावस सासरे व मावस सासु यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर भादवी कलम- ४९८(अ), ४०६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे करीत आहेत.