जळगाव ( प्रतिनिधी ) – लता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात लता मोरे यांना या नियुक्तीचे पत्र देण्यात आले . माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर , माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी मेहनत घेऊन महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्राधान्याने बळ देणार असल्याचे यावेळी लता मोरे यांनी सांगितले . त्यांचा मोठा जनसंपर्क आणि आतापर्यंतच्या सामाजिक कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही जबाबदारी दिली असल्याचे आणि नक्कीच पक्षाला त्यांच्या नियुक्तीचा फायदा होणार असल्याचे सांगत महिला पदाधिकाऱ्यांनी लता मोरे यांचे अभिनंदन केले .