• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंडिया फोर्ब्जकडून पाचोऱ्याचे डॉ. भूषण मगर यांच्या कामगिरीची दखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णसेवेचा मानबिंदू असलेले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर पाटील यांच्या कार्याची दखल “इंडिया फोर्ब्ज” या आंतरराष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे !

इंडिया फोर्ब्जच्या 3 जूनच्या अंकामध्ये ( पृष्ठ 43 वर ) “विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डिलिव्हरिंग अफोर्डेबल, कॉलिटी हेल्थकेअर सर्विसेस अप टू द लास्ट पर्सन ऑफ सोसायटी” या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखांमध्ये विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातुन डॉ. भूषण मगर -पाटील यांच्या समग्र रुग्णसेवेचा गौरव केला आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या या समाजाभिमुख डॉक्टरची दखल पहिल्यांदाच इंडिया फोर्ब्ज या इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. डॉ. भूषण मगर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोरोनाच्या प्रारंभीच्या गोंधळलेल्या स्थितीत स्वतःचे हॉस्पिटल शासनाला हस्तांतरित करणारे महाराष्ट्रातील सर्वात पहिले कोरोनायोद्धा म्हणून डॉ. भूषण मगर पाटील ओळखले जातात. कोरोनाकाळात स्वतःच्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 3500 रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. 1200 रुग्णांवर मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी व रुग्णसेवेबद्दलची कणव प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोरोनारुग्ण पाचोरा येथे उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोनाच्या अत्यंत भयावह वातावरणात अहोरात्र रुग्णसेवा करीत असतानाच त्यांनी पंचक्रोशीतील अनेक वैद्यकीय व्यावसायिक व हॉस्पिटलला मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्यभरातील अनेक संस्था, संघटना, वृत्तपत्रे, चॅनल्स, पक्ष-संघटना आदींनी त्यांना वेगवेगळे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले आहे.

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत ‘पाचोरा सेंट्रल’ च्या इमारतीत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. अत्याधुनिक उपचार पद्धती, उच्चशिक्षित, तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, उच्च दर्जाच्या अत्यावश्यक सुविधा विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुरवल्या जातात.

डॉ भूषण मगर पाटील याबाबत म्हणाले की , इंडिया फोर्ब्जने माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल फोर्ब्ज परिवाराचे धन्यवाद. विद्यार्थीदशेत असतांना वैद्यकीय क्षेत्र निवडताना रुग्णसेवा हा माझ्या जीवनाचा ध्यास आहे हे स्वप्न घेऊनच मी शिक्षण पूर्ण केले ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा माझा दृढ संकल्प आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचारपद्धती माझ्या ग्रामीण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा माझा संकल्प आहे.


 

 

Tags: #pachora dr.bhushan magar #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा

Next Post

लता मोरे राष्ट्रवादीच्या महानगर उपाध्यक्षपदी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लता मोरे राष्ट्रवादीच्या महानगर उपाध्यक्षपदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon