मुंबई (वृत्तसंस्था) – चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला युतीची ऑफर दिल्यानंतर संजय राऊतांनी पाटलांना टोला लगावला. वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची अस संजय राऊत यांनी म्हंटल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊत आणि शिवसेनेवर अत्यंत कडक शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची अस म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची.
मोदींनी आदेश दिल्यास वाघाशी पुन्हा एकदा मैत्री करू अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा….त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, पण वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची अस म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारले होते.