जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील बोरनार गावात आषाढी एकादशी निमित्त आज सकाळी 11 वाजता पूजा , प्रसाद व विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला हे मंदिर चाळीस वर्षांपूर्वीचे व गिरणा नदीच्या काठावर आहे परिसरातील चाळीस खेड्यापाड्यातले भाविक येथे येतात. या विठोबाला ‘ बोरणारचे विठोबा ‘ असंदेखील म्हणतात. येथे दर एकादशीला किर्तन हरिपाठ होत असतो
सौ कल्पना चौधरी ( सरपंच ) , सुरेश थोरात ( उपसरपंच ) , वैशाली कोळी ( ग्रामपंचायत सदस्य ) यांच्यासह सयाबाई चिंचोरे , मंगलबाई मराठे , रमदाबी हमीदखा पठाण , कल्पनाबाई सतीश चौधरी , मंदाबाई बडगुजर , श्याम ठाकूर , छोटू देशमुख , बुशरा अन्सार देशमुख , एस जी पवार ( ग्राम विकास अधिकारी ) , सुरेश तेज्वमल , पप्पू सोनवणे , सरपंच गोविंदा पवार , पो हे कॉ उगले , स्वप्निल पाटील , हेमंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.