अमळनेर (प्रतिनिधी) –आज खा. शि. मंडळ हि शैक्षणिक संथा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक कार्य करित आहे. श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या दानशूरतेतून जिचे बीजारोपन झाले. साने गुरुजींनी शिक्षक म्हणून काम केले. अशा अनेक विभूतींमुळे संथेचा विस्तार झाला.
हे सर्व करित असतांना पुर्वीच्या व विद्यमान संचालकांच्या कार्य पध्दतिने व मदतीने विस्तार झाला.त्यात तिन माध्यमिक व प्राथमिक शाळा,एक इंग्लिश मेडियम, एक महाविद्यालय ,फार्मसी कॉलेज असा विस्तार झाला.हे कार्य पुढेही असेच सुरु असावे म्हणून दर तिन वर्षानी संचालकांची निवडणूक होते. कोरोनामुळे हि निवडणूक पुढे ढकलली आणि या नविन वर्षात खा. शि. मंडळाच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र जैन तर कार्योपाध्यक्षपदी कल्याण पाटील यांची निवड करण्यात आली. डॉ.बी एस पाटील,नीरज अग्रवाल, डॉ.संदेश गुजराथी, हारि आण्णा, योगेश मुंदडे, प्रदिप अग्रवाल या सर्व संचालकांनी अभिनंदन केले.








