सावदा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील चिनावल फाट्याजवळ टिंगल टवाळी केल्याच्या रागातून एकाने हातात तलवार घेवून बापलेकावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रावेर घडली आहे. याप्रकरणी एकावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सावदा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज उर्फ शांताराम सिताराम आढळे (वय-५४) रा. वाघोदा, बु ता रावेर हे आपल्या परिवारासह राहायला आहे. रविवारी ९ एप्रिल रोजी युवराज हे त्यांचा मुलगा ऋतीक याच्यासोबत चिनावल फाट्याजवळील डी.के. महाजन यांच्या घरानजीक गप्पा मारत असतांना त्याठिकाणी दारूच्या नशेत संशयित इमाम मुबारक तडवी हा तिथे आला. यावेळी टिंगल टवाळी केली. त्यानंतर इमाम हा घरी निघून गेला. थोड्यावेळाने इमाम हा हातात तलवार घेवून दोघाजवळ आला. “थांब शांतराम तू लय मातला आहे, तुला आता पाहतोच” असे बोलून त्याच्यावर तलवारने वार केले. यात कपाळावर आणि हातावर दुखापत केली. तर ऋषीकेश याला मारहाण केली. याप्रकरणी शांताराम आढळे यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी इमाम मुबारक तडवी रा. वाघोदा बुद्रुक, ता. रावेर याच्या विरोधात सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.