पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा – भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे पदापेक्षा जास्त उमेदवार असल्याने या निवडणुकीत कोणाशी युती करायची यासाठी भाजप- शिंदे शिवसेना गट- ठाकरे शिवसेना यांच्याशी युती बाबत चर्चा झाली परंतु समाधान कारक असा निर्णय झालेला नाही स्थानिक पातळीवर सहकार क्षेत्रात राजकारण नको या तत्वावर निवडणूक जरी लढणार असलो तरी अद्याप कोणालाही शब्द दिलेला नाही निर्णय झालेला नाही आणि युतीचा निर्णय संपुर्ण कार्यकर्त्याना विचारूनच निर्णय घेतला जाईल माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा पत्रकार परिषदेत सुतोवाच पत्रकार परिषदेसाठी पिटीसी चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, खलील दादा देशमुख, भडगाव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, सतीश चौधरी, रणजीत पाटील. डी डी पाटील भडगाव, हारुण देशमुख इत्यादी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.