अमळनेर ( प्रतिनिधी ) – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मारवड ते धार रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. या संदर्भात एका दुचाकी धारकावर मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बापू वेलचंद पाटील रा. वाघरे, ता.पारोळा हा तरुण त्याची दुचाकी (एमएच १८ बीबी ८८०६) मारवाड – धार रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ सीडी ४१२१) वरील चालक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड, ता. अमळनेर यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत बापू वेलचंद पाटील हा गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात घडल्यानंतर दरपण मुरलीधर पाटील हा दुचाकी घेऊन प्रसार झाला होता. या संदर्भात जखमी बापू वेलचंद यांचा भाऊ शरद पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीधारक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड, ता.अमळनेर यांच्या विरोधात रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे.