जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथे शेतात बांधलेल्या म्हशीच्या पाडसाच्या बिबट्याने फडशा पाडून त्याला फ़स्त् केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी वनविभागाकडून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
याबाबत बाबत सविस्तर माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे पांडुरंग प्रताप बोबडे यांच्या मालकीच्या नायगाव शिवारातील शेतामध्ये दि.8 एप्रिलच्या मध्यरात्री बिबट्याने म्हशीचा पाडसाचा फडशा पाडला दि. 9 रोजी पांडूरंग बोबडे हे सकाळी 10 वाजता शेतात गेल्यामुळे त्यांना म्हैसच्या पाडसाचा फडशापडल्यामुळे परिसरात एकच खळबड उडाली आहे. या परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सदर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.