सांस्कृतिक महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्व महिला भाविकांसाठी१०० बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ
चाळीसगाव (प्रतिनिधी) – गणेशोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून चाळीसगाव वासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळावी तसेच आबालवृद्धांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी २०१९ पासून ‘चाळीसगावचा एकदंत – सांस्कृतिक महोत्सव” आयोजित केला होता. मध्यंतरी कोरोनामुळे सर्वच सणांवर निर्बंध आल्याने आपल्याला ते साजरा करता आले नाहीत.
मात्र यावर्षी सर्व निर्बंध उठल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा भव्य दिव्य असा “चाळीसगावचा एकदंत” सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना सहकुटुंब – सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन महोत्सवाचे आयोजक भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन ने केले आहे.
दि.३१ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती ते घाट रोड, तहसिल कचेरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत चाळीसगावच्या एकदंताची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. सदर मिरवणुकीत पूर्णवेळ आमदार मंगेश चव्हाण हे सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्ष व शिवनेरी फाउंडेशन च्या पदाधिकारी यांच्यासह चाळीसगाव शहरातील हजारो गणेश भक्तांनी मिरवणुकीत सहभागी होत बाप्पांचे स्वागत केले. आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांच्याहस्ते तसेच अनेक जोडप्यांच्या हस्ते चाळीसगावच्या एकदंताची विधिवत स्थापना करण्यात आली.
“चाळीसगावचा एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवात आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
गुरूवार दि.१ सप्टेंबर २०२२ – संध्याकाळी ७ वाजेपासून
चाळीसगाव तालुक्यातील नृत्य कलागुणांना संधी
Dance Chalisgaon Dance
शुक्रवार दि.२ सप्टेंबर २०२२ – वेळ – रात्री – ८ वा.
रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक
यांचे “हरीकिर्तन”
शनिवार दि.३ सप्टेंबर २०२२ – वेळ – रात्री ८ वाजता
डोंगर हिरवा गार गृप (गोल्डन बँण्ड) शिरपूर यांचा
“कानुबाई गीतांचा कार्यक्रम”
रविवार दि.४ सप्टेंबर २०२२ वेळ – संध्याकाळी – ७ वा.
जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे
“जादूचे प्रयोग”
सोमवार दि.५ सप्टेंबर संध्याकाळी ७ वाजता
चाळीसगाव शहरात प्रथमच
सुप्रसिद्ध गायक, दिगदर्शक, संगीतकार
अवधूत गुप्ते यांचे Live Concert
मंगळवार दि.६ सप्टेंबर २०२२ वेळ सायंकाळी ७ वाजता
अखिल भारतीय कवी संमेलन
——————-
सहभागी कवी
——————–
१ ) श्री.शशिकांत यादव, देवास
२) कवी सुदीप भोला
३) अमन अक्षर (इंदौर)
४) मुन्ना बैटरी, मंदसौर
५) मणीकां दुबे, सिहोरा
६) अभय निर्भिक, अम्बेडकर नगर (उत्तरप्रदेश)
बुधवार दि.७ सप्टेंबर २०२२ वेळ संध्याकाळी – ७ ते ९
मुंबई येथील सुप्रसिद्ध आई एकविरा बिट्स यांची
“संगीतमय बँजो नाईट”
गुरुवार दि.८ सप्टेंबर २०२२ रात्री – ८ वाजता
सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांचे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जाहीर व्याख्यान
विषय – “शिवविचार – कालं, आज आणि उद्या”
गुरुवार दि.८ सप्टेंबर २०२२ वेळ – सकाळी ८ वाजता
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमिताने विविध स्तरातील ७५ जोडप्यांच्या हस्ते
सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद
शुक्रवार दि.८ सप्टेंबर २०२२
श्री गणेश विसर्जन मिरवणूक
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण – एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंग दर्शन व ३० फूट उंच भव्य शिवलिंग
सर्व कार्यक्रमांचे ठिकाण –
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉइंट, चाळीसगाव
सांस्कृतिक महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्व महिला भाविकांसाठी
१०० बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ
(१ एलीडी टीव्ही, ५ मिक्सर, २ गॅस शेगडी, १० फॅन, १० भिंतीवरची आकर्षक घड्याळे, १० कुकर, १० डिनर सेट, १२ पोळी डबा, १५ कपबशी सेट, २५ पर्स)