जळगाव (प्रतिनिधी) – बुद्धीची देवता गणपती बाप्पाचे बुधवार दि.३१ ऑगस्ट रोजी आगमन झाले असून गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संकुलांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात श्रीं ची विधिवत स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोरया चा गजर करुन परिसर दणाणून टाकला. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली, विघ्नहर्ता गणरायाला प्रार्थना करुन रुग्णांना लवकर बरं वाटू दे अशी प्रार्थनाही यावेळी स्टाफच्यावतीने करण्यात आली.
पारंपरिक फेटे परिधान करुन गणरायाचे स्वागत
गोदावरी फाउंडेशन संचलित,गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल,जळगाव येथे गणपती बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीचे फेटे बांधून बाप्पांचे स्वागत केले. या पूजनानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी गोदावरी समूहाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, स्कूलच्या प्रिन्सिपल नीलिमा चौधरी, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात बाप्पाची स्थापना
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. दमदार मिरवणुकीनंतर रुग्णालयात बाप्पांची प्रतिष्ठापना करून डॉ.वरून देव व सौ.स्नेहल गवारे-देव यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी गोदावरी समूहाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील , सदस्य डॉ. केतकीताई पाटील, हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, नर्सिंग सुप्रीटेंडंट संकेत पाटील, किर्ती पाटील, मनिषा खरात, रुग्णालयातील डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ आि ण कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुसावळ स्कूलमध्ये ४ हजार लाडूंचे वाटप
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ येथे गणपती बाप्पाचे आगमन झाले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते गणपतीचे पूजन करण्यात आले. यावेळी ४००० मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आले. यावेळी प्रिन्सिपल अनघा पाटील, रुची, वर्षा, अंकिता मॅडम, तसेच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या संयोगी नर्सिंग ऑफिसर डिवायना पवार, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी नर्सिंगमध्ये गणेशाच्या आगमनाने जल्लौष
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात बुधवारी गणेशाच्या आगमन झाले असून यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लौष केला. याप्रसंगी प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, प्रा.विशाखा वाघ, प्रा.अश्विनी वैद्य, प्रा.जसनिथ दाया, संचालक शिवानंद बिरादर, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे यांच्यासह सर्व टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफ तसेच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थीती होती. याया कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष २०१९ बॅचने केले आहे. अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची सजावट करण्यात आली असून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे.