मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष; खड्ड्यात दुचाकीस्वार महिला बालंबाल बचावली

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात ते डी मार्ट पर्यत रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते शिरसोली नाक्या समोरील डी मार्टच्या बाजूलाच आरटीओ कार्यालयाकडे जातांना एक भला मोठा खड्डा असून या खड्ड्यात नेहमी दुचाकीस्वार पडत असल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक महिला दुचाकीने जात असल्याने तिची दुचाकी त्या खड्ड्यात अडकताच ती महिला पडली होती. मात्र जवळच असलेल्या लोकांनी त्या महिलेला वाचविण्यात यश आले. अन्यथा त्या महिलेच्या डोक्याला जबर मार लागून जखमी झाली असती. अश्या घटना नेहमी घडत असतांना मात्र या खड्ड्याकडे मनपा प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष दिसत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर खड्डा बुजविणार का? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. अजून किती जणांची या खड्ड्यात पडण्याची मनपा वाट पाहत आहे? त्वरीत हा खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघडा पडलेला ढाचा असून मनपाकडून कोणताही सूचना फलक लावलेला नाही.

डी मार्ट चौकात वाहतुकीची वर्दळ
शहरात सुप्रसिद्द असलेल्या डी मार्ट मध्ये ग्राहक वस्तू घेण्यासाठी येत असल्याने या परिसरात नेहमी वाहनांची रेलचेल सुरु असते. तसेच हा रस्ता जळगाव ते पाचोरा मेन असल्याने बस, ट्रक, व चारचाकी वाहनांचा ये जा सुरु असल्याने वाहतूक ठप्प होते.यावेळी दुचाकीस्वारांना या उघडया खड्डयाकडूनच वाट काढावी लागते. मात्र या खड्ड्यात दुचाकी अडकून पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.








