नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासात तब्बल 4 लाख 1993 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे. तर मागील 24 तासात तब्बल तीन हजार 523 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, 2 लाख 99 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर मागील 24 तासात यशस्वीरीत्या मात केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नव्यानं आढळलेल्या रुग्णांमुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत दोन लाख 11 हजार 853 जणांनी देशात कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशात सध्या 32 लाख 68 हजार 700 दहा जणांवर कोरोनावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बहुतेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच लसीकरण मोहीम देखील तीव्र करण्यात आली आहे. आज पासून 18 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत देशात 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 व्यक्तींना लसीकरण करण्यात आला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.







