जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील कचरा संकलनासाठी नगरपरिषदेने खरेदी केलेल्या 13 घंटा गाड्या व 1 ट्रॅक्टरचे आज लोकार्पण करण्यात आले .
जामनेर नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानाच्या बक्षिस निधीतून खरेदी केलेल्या 13 नवीन घंटा गाड्यां व 1 ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा .आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला
या लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष शरद पाटील , मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले , जितु पाटील , गटनेते डॉ.प्रशांत भोंड , माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अनीस शेख , आरोग्य सभापती फारुख मणियार , नगरसेवक अतिश झाल्टे , नगरसेवक बाबुराव हिवराळे , धोंडू पाटील, कैलास नरवाडे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.