नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – मे महिन्याची सुरुवातच सुट्टीने झाली आहे. देशभरातील बँकांचे कामकाज आज होणार नाही. मे महिन्यात अकरा दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारच्या सुट्टीचा देखील समावेश आहे.
मे महिन्यातील सुट्ट्यां – १ मे – महाराष्ट्र दिन व रविवार , ३ मे- मंगळवार ( ईद , परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया) , ८ मे- रविवार , ९ मे- रवींद्रनाथ टागोर जयंती (विशिष्ट राज्य) , १४ मे- दुसरा शनिवार , १५ मे- रविवार सुट्टी , १९ मे- गुरुवार (बौद्ध पौर्णिमा) , २२ मे- रविवार , २८ मे- चौथा शनिवार , २९ मे- रविवार सुट्टी .
बँकांना सलग सुट्ट्या असल्यास सामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं. निवृत्तीवेतन धारकांना देखील रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे संभाव्य त्रास टाळण्यासाठी डिजिटल बँकिंगचा पर्याय उपलब्ध असेल. पैसा काढणे, पैसे जमा करणे तसेच विविध देवाणघेवाणीसाठी ई-बँकिंग महत्वाची ठरते. तुम्ही विविध बँकांच्या संकेतस्थळावर जावून माहिती घेऊ शकतात. ज्यामुळे बँका बंद असल्या तरीही तुमचे बँकिंग कामकाज थांबणार नाही.