जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळला . भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती .
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचेविषयी वादग्रस्त व ऐकेरी उल्लेख केल्याने राज्यभर शिवप्रेमी जनतेत तीव्र संतापाची लाट असुन त्यांचा जागोजागी निषेध केला जात आहे. जामनेर शहरातही शिवप्रेमी बांधवानी निषेध सभा व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांना उपस्थितीचे. आवाहन केले होते.
या वेळी भाजपा वगळता राष्ट्रवादी, प्रहार जनशक्ति पक्ष, काँग्रेस, शिवसेना, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ यांनी उपस्थिती दिली. राजमाता जिजाऊ चौक , नगर परिषद समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करुन भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करुन राज्यांच्या जबाबदार व्यक्तीकडून असे विधान केले जात असेल तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ असुन रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांचा कोणताही संबंध नाही समकालीन इतिहासात त्याची कोणतीही भेट झाली नसून तसा पुरावाही नाही यावर उच्च न्यायालयानेही रामदास स्वामी गुरु नव्हते असा निकाल दिलेला असताना राज्यपाल सारख्या व्यक्तिने असले विधान करणे चुकीचे असल्याचे उपस्थीत शिवप्रेमी यांनी निषेध करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करुन राज्यपाल यांनी आपली संस्कृती दाखऊन दिली असा संताप व्यक्त करण्यात आला त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय गरुड, युवक अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज महाले, शेतकरी आघाडीचे अण्णा पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जितेश पाटिल , भारत मुक्ती मोर्चाचे राजु खरे, शिवसेनेचे अतुल सोनवणे, भरत पवार, संभाजी ब्रिगेडचे राम अपार , मराठा सेवा संघाचे योगेश पाटील, सुनील कानडजे, विनोद पाटील, जावेद मुल्लाजी, सईद मुजावर, मोहन चौधरी, संतोष झालटे, उत्तम पाटील, सचिन बोरसे, आईफज शेख, खालिद साहेब, इम्रान भाई, अनिस पहेलवान, अजमल राठोड, कैलास अपार, माधव चव्हाण, वैभव बोरसे, डॉ बाजीराव पाटील, प्रल्हाद बोरसे, निलेश गायकवाड , रामा मगरे , विजय तायडे, दिलीप मराठे , अविनाश पाटील , सचिन बोरसे , दिपक राजपूत , दिपक खाटीक , आकाश खाटीक , गोलू खाटीक , गोपाल बरकले , उदय बुंदले , भूषण बुंदले , निखिल परदेशी , शुभम चौधरी , प्रशांत साबळे , पवन सोनवणे , केतन सोनवणे , मनोज बोरसे , विलास वराळे , विकास सोनवणे , राम खाटीक , आनंद सोनवणे , संदीप पाटील, हरी मराठे , राहुल भुलाने , भूषण धनगर , गोलू बोरसे, आकाश बंडे, अविनाश बोरसे, आकाश पाटील उपस्थीत होते
या निषेध आंदोलनाला भाजपाची अनुपस्थिती सर्वांना खटकली शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा देखावा करणारी भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल यांचा साधा निषेध करू शकत नसेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचेपेक्षा ते महत्वाचे आहे हेचं यातून सिद्ध होते, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या . विशेष म्हणजे भाजपने उपस्थीत राहावे असे आवाहन केले गेलेले होते..