• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2021
in महाराष्ट्र
0

औरंगाबाद (वृत्तसंस्था) – कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीची आता फेररचना करण्याची गरज असून शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांकडे युपीए आघाडीचे नेतृत्व देण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आता देशात एनडीए आघाडीचे अस्तित्वच उरलेले नाही. भाजप प्रणित आघाडीतून बहुतेक सर्व राजकीय पक्ष बाहेर पडले आहेत. युपीए आघाडी आज अस्तित्वात असली तरी तिचे अस्तित्व जाणवण्या इतके प्रभावी नाही.

येथे आयोजित करण्यात आलेल्या जयभीम फेस्टीव्हल मध्ये राऊत यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की आज युपीए आघाडीत काही पक्ष उरलेले असले तरी अन्य प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली या आघाडीत काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पवारांसारख्या नेत्यांकडे या आघाडीचे नेतृत्व दिल्यास या आघाडीची ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.

अनेक प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील होऊ शकतात आणि त्यातून भाजपला समर्थ पर्याय दिला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने थोडी त्यागाची भूमिका घेतल्यास युपीए आघाडीची पुनर्ररचना होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत आता राजकारणातील वातावरणात बदल होंऊ लागल्याचे जाणवत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आज दिल्ली मुकी आणि बहिरी झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत कोणत्याहीं महत्वाच्या घडामोडी होताना दिसत नाहीत. दिल्लीत आज ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षातील सदस्यांना मोकळेपणी बोलता येत नाही, त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यांना एकमेकांकडे पाहून हसण्याचाहीं अधिकार आता उरलेला नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली.

आपल्याकडे पाहून कोणी हात केला तर ते दृष्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल अशी धास्ती आता लोकांना वाटु लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रीय स्तरावर राजकारण केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. अनेक प्रादेशिक पक्षांना आणि अन्य पक्षांनाही आता नवीन नेतृत्व हवे आहे. हे नेतृत्व आता महाराष्ट्रच देऊ शकतो असे ते म्हणाले.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन जी आत्महत्या केली त्या विषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की,डेलकर यांनी जी चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यात भाजपशी संबंधीत लोकांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांना त्यांच्या निवासस्थानीही आत्महत्या करता आली असती पण त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली आहे. मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्‍वास होता, ते आपल्या मृत्यूची चौकशी करतील अशीच त्यांना अपेक्षा असावी असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

मोदींच्या लसीकरणाने संभ्रम दूर होतील – एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया

Next Post

पाचोरा कृ.उ.बा. समिती प्रशासक नियुक्ती आदेश रद्द ; तत्कालीन संचालक मंडळाकडे पदभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा कृ.उ.बा. समिती प्रशासक नियुक्ती आदेश रद्द ; तत्कालीन संचालक मंडळाकडे पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon