धरणगाव ( प्रतिनिधी ) – बांभोरी बुद्रुक येथे कृषी केंद्राचे गोडावून फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण संजय पाटील (वय-२९, रा.बांभोरी ता.धरणगाव) यांचे बांभोरी गावात कृषी केंद्र आहे. दुकानाच्या बाजूला गोडावून आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ४ हजार ३०० रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर आणि ७०० रुपयांची रोकड असा ५ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. भुषण पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना दीपक पाटील करत आहे.