अमळनेर ( प्रतिनिधी ) – सिंधी कॉलनी भागातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून १० हजार रुपयांची रोकड आणि दागिने असा ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर लालचंद डावराणी ( रा. सिंधी कॉलनी ) कामानिमित्त २७ फेब्रुवारीरोजी बाहेरगावी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून १० हजार रुपयांची रोकड आणि ४५ हजार रुपये किमतीचे दागिने असा ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला किशोर डावराणी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.