नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज (सोमवार) संसदेत सादर केला आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पावेळी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं सांगत हमीभावाबद्दल माहिती दिली आहे.

मोदी सरकारवर नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. आमच्या सरकारने युपीए सरकार तुलनेत तीन टक्के जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.
आमच्या सरकारच्या काळात रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली. या शेतमालाच्या खरेदीला आणखी वाढवण्यात आली आहे. याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मागील वर्षात १ हजार कृषी बाजार ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे.
यंदा कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४० हजार कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर सुक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे.







