रावेर (प्रतिनिधी) – शहरात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडेंची आपल्या टिम सोबत सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दरोरोजच्या पायी पेट्रोलिंग करत असल्याने शहरात चर्चा आहे.

रावेर शहरात सायंकाळच्या सुमारास बेशिस्त वाहनांच्या अनेक तक्रारी पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्याकडे येत होत्या. त्यांनी यानिमित्ताने दरोरोज रावेर शहरात पायी पेट्रोलींग करायला सुरुवात झाली आहे, यामुळे शहरात एकच चर्चा आहे. आज सायंकाळी त्यांच्या सोबत पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोना महेंद्र सुरवाडे, पोको पुरुषोत्तम पाटील, पोको मंदार पाटील, पोकॉ सुकेश तडवी, सुनील वडणेरे, पोकॉ. सचीन गायकवाड, हेकॉ. भागवत धांडे होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक आदी ठिकाणी पायी पेट्रोलिंग केली.







