जळगाव ( प्रतिनिधी ) – मूळचे चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील रहिवाशी महेंद्र पाटील यांची माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या राज्य सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
वरगव्हाणचे सुपुत्र व पुण्यास वास्तव्यास असलेले महेंद्र पाटील यांची निवड ही परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वाची ठरेल. त्यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी करुन नियुक्ती पत्र पाठवण्यात आले आहे . महेंद्र पाटील यांना पुढच्या वाटचालीसाठी राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जुबेर शेख , राष्ट्रीय संर्पक प्रमुख योगेश मालुंजकर , राष्ट्रीय कार्याध्यक्ष . संजीव आहिरे , राष्ट्रीय कोषाध्यक्ष मन्सुर मुलाणी , राष्ट्रीय मुख्य संघटक , रविंद्र उगले , राज्य महिला अध्यक्षा रंजना देशमुख , अजित मोरे, सौ.अंबिका पाटील , भुषण देशमुख दिपक कोनाळे , के.एच वने , जितेंद्र सरोदे चंचलताई पवार रेखाताई निकुंभ , शोभा पाटील आदी . उपस्थित होते.