थिरुवनंतपूरम ( वृत्तसंस्था ) – केरळमध्ये मंगळवारी गरोदर बकरीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. आरोपीची ओळख पटली असून तो मूळचा तामिळनाडूचा असून हॉटेल कर्मचारी आहे. हॉटेल मालकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सेंथिलला अटक केली आहे.
हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री कर्मचाऱ्यांना बकरीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर बकरी रक्तबंबाळ अवस्थेत होती. यावेळी त्यांना आरोपी तेथून पळून जात असल्याचा प्रयत्न करता दिसला. आरोपी सेंथिल दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये काम करत होता.
ही बकरी हॉटेल मालकाची होती. हॉटेलच्या मागे शेडमध्ये तिला बांधण्यात आलं होतं. पोलिसांनी आरोपीवर पशु क्रूरतेच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक कृत्य केल्याचीही नोंद आहे. हॉटेल मालकाने या कृत्यामध्ये अजून दोघे सहभागी होते असा आरोप केला होता. पण पोलिसांना तपासात सेंथिल एकटा असल्याची माहिती मिळाली.
शवविच्छेदन करणार्या शासकीय पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालात बकरीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.