जळगाव ( प्रतिनिधी ) – काश्मीर फाईल बद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होत आहे अशा आरोपींवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन गुरूवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले.
जळगाव शहरातील एका संस्थेच्या माध्यमातून सिनेमागृहात काश्मीर फाईल बघितल्यानंतर चिथावणी देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडली आहे. त्या घटनेला जबाबदार असलेल्या संस्थेला व चिथावणी देणाऱ्या महिलेला अजामीन पात्र कलमानुसार दोषी ठरवून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जळगाव शहरातील संघटनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देवून केली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल फोरमच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, नसरुल फातेमा, जनक्रांती मोर्चाचे संस्थापक मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे भरत कर्डिले, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, जन क्रांतीचे वाल्मीक सपकाळे, छावा युवा मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, मानियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल मजहर पठाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष मुजीब पटेल आदी उपस्थित होते.