जळगाव ( प्रतिनिधी ) – गुढीपाडव्याच्या समाज प्रबोधनपर शुभेच्छा देणारा एक गुढी- नव्या निश्चयाची हा उपक्रम अभिनव प्राथमिक विद्यालयात शिक्षिका स्नेहल ठाकूर यांच्या संकल्पनेतुन राबवण्यात आला .
या उपक्रमाअंतर्गत इयत्त्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी गुढीचे चित्र रंगवून जनजागृती पूर्वक संदेश पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी रक्तदान, साक्षरता, महिला सक्षमीकरण ,जलसुरक्षा, स्रीभृण हत्या, भ्रष्टाचार, कोरोना , पर्यावरण या प्रश्नांवर घोषवाक्यासहित गुढीचे चित्र रंगवले
सहभागी विद्यार्थी व त्यांच्या विषयाची नावे अशी आहेत – सोनाक्षी परदेशी- रक्तदान हेच जीवनदान , लोकेश माळी- मास्क वापरा जीव वाचवा , शिवम पवार- झाडे लावा झाडे जगवा , विनायक बाविस्कर- लसीकरणाला द्या साथ कोरोनावर करू मात. प्रियंका बाविस्कर- भ्रष्टाचार मिटवूया देश पुढे नेऊया , तेजस्विनी जाधव -पाणी वाचवा जीवन वाचवा , नंदिनी परदेशी- अक्षर कळे ,संकट टळे , प्रतिक्षा द्विवेदी- करूनी कचरा कमी आरोग्याची मिळेल हमी मिळेल , पूर्वा रूले-लेक वाचवा लेक वाढवा लेक घडवा.
या उपक्रमासाठी शिक्षण मंदिर संस्थेचे अध्यक्ष एस.डी. चौधरी, प्राचार्या सुवर्णा चौधरी व मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.