पुणे ( प्रतिनिधी ) – घरी शिकवणीस येणाऱ्या शिक्षिकेचा अल्पवयीन मुलाने विनयभंग केला . प्रसाधनगृहात मोबाइल संच ठेवून चित्रीकरण करण्यात आला कर्वेनगर भागात ही घटना घडली. अल्पवयीन मुला विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षिकेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्षिका पाच वर्ष इंग्रजी विषयाच्या शिकवणीसाठी मुलाच्या घरी जात होत्या. काही दिवसांपूर्वी त्या घरातील प्रसाधनगृहात गेल्या होत्या. मुलाने प्रसाधनगृहात मोबाइल संच लपवून ठेवला होता. शिक्षिका प्रसाधनगृहात जाण्यापूर्वी मुलाने मोबाइलमधील व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले होते. ही बाब शिक्षिकेच्या निदर्शनास आली. यापूर्वीही मुलाने चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शिक्षिकेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर मुला विरोधात अलंकार पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदा, विनयभंग या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.