मुंबई ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. एका मेलद्वारे ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आल्या आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. हा कट उघड होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे ई-मेलरने म्हटले आहे. त्यामुळे हा मेल खरा असेल आणि खरंच त्या व्यक्तीने आत्महत्या केली, तर तपास यंत्रणांची डोकेदुखीही वाढण्याची शक्यता आहे.
पीएम मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल सज्ज आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहे. स्लीपर सेलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना 20 किलो आरडीएक्सने मारण्याचा कट रचला जात होता. सुरक्षा एजन्सी माहिती गोळा करत आहेत की पीएम मोदींच्या हत्येचा कट रचल्याबद्दल आलेला हा मेल कुठून आला आहे? हा मेल पाठवण्यामागे कुणाचा हात आहे. ईमेलनुसार मोदींवर हल्ल्याचा प्लॅनही तयार आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशीही संबंध आहेत. ज्या मेल आयडीवरून मेल आला आहे त्याचाही कसून तपास करण्यात येत आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेकडे आला आहे, मात्र यात सुरक्षा यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.