मुंबई (वृत्तसंस्था) – नजरचूक वगैरे काही नाही! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु, आज १ एप्रिल आहे. हे एप्रिल फुल पण असू शकतं. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो.” अशा शब्दात माजी मुख्यमंत्र व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या दानातीवर शंका व्यक्त केली आहे.

लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून मागे घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं स्पष्ट केलं आहे. निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावरून आता काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.







