यावल (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत २७ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जळगांव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, रावेर, भुसावळ , यावल, या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे, पथकाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका प्रतिनिधी, पूर प्रसंगी बचाव करणारे पट्टीचे पोहोणारे, सर्पमित्र, स्वयंसेवक , मनपा अग्निशमन विभाग व स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे, एस.डि.आर.एफ. (SDRF ) च्या धर्तीवर जिल्हा आपत्ती निवारण पथक डि.डि.आर.एफ. (DDRF ) ची निर्मिती व्हावी या उद्देशाने मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशाने आज दि १ ऑगस्ट २०२० कार्यशाळा क्रमांक ७ यावल येथे दुपारी २ वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासीनायब तहसीलदार आर.के. पवार, नायब तहसीलदार रवींद्र पाटील, लिपिक सुयोग पाटील जिल्हापत्तीव्यवस्थापन अधिकारी एन.पि.रावळ, एस.डि.आर.एफ पथकाचे पो.नि. के.यु.पवार, पो.स.नि. एस.एस.सोनवणे , नदी काठचे तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, नदीकाठच्या गावातील पट्टीचे पोहणारे, पोलीस पाटील, सर्पमित्र , वन्यजीव संरक्षण संस्था,अर्जुना संस्था संस्कृती फाउंडेशन , संस्थेच्या स्वयंसेवका सह जवळपास २५ ते ३० व्यक्तीनी सोशल डिस्टनसिग राखत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळे सहभाग नोंदवुन पूर, आग ,रस्ते अपघात, भूकंप, सर्पदौंश इ बाबत एस.डि.आर.एफ. राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्या पथकाद्वारे प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.









