पाचोरा (प्रतिनिधी) – भारतीय जनता पा ही ही जन जन जन जनर्टी व रिपाई (आठवले गट) रासप,रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम पक्ष ह्या महायुतीच्या माध्यमातून झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष्यांच्या माध्यमातून पाचोरा येथे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिक-ठिकाणी दूध संकलन केंद्रांच्या बाहेर बसून तसेच शहरातील जारगाव चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात करण्यात आले. दूध उत्पादक व शेतकऱ्याबाबत ह्या महाविकास आघाडी सरकारची उदासीनता अत्यंत संतापजनक आहे.दूध उत्पादक ,शेतकरी राजा जेव्हा पहाटे उठून दूध काढतो, प्रसंगी जनावराच्या लाथा खातो आणि दूध विक्रीसाठी आणतो. ही वस्तुस्थिती शहरात राहणाऱ्या मुख्यमंत्री राज्यकर्त्याना माहिती नाही हे दुर्दैव असून तात्काळ सरकारने दूध उत्पादकांना प्रति लिटर रू.१० अनुदान व दूध पावडरला प्रति किलो ५० रू. अनुदान दिले पाहिजे अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी केली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतांना अश्या भयावह अडचणीच्या परिस्थितीत जगाचा पोशिंदा…शेतकरी व दूध उत्पादक बांधव ह्या झोपलेल्या महाविकास आघाडी सरकार कडून दुर्लक्षित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सीमा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर ह्या आघाडी सरकारच्या दरबारी पोहोचलाच नाही. याची खंत वाटते त्यामुळे पाचोरा तालुक्यातील दूध उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या महाएल्गार आंदोलनाच्या माध्यमातुन या निवेदनासोबत दूध पिशवी देऊन आम्ही मा.प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या कडे मांडीत आहोत असे भाजपा तालुका अध्यक्ष युवा नेते अमोल शिंदे यांनी सांगितले.

निवेदनातील प्रमुख मागण्या
१) गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर रू.१०/- व दूध पावडरला प्रति किलो रू.५०/-अनुदान मिळावे.
२) दूध खरेदीचा दर प्रति लिटर रु.३०/- करण्यात यावा.
३) शेतकऱ्यांच्या मागील वर्षाचा घरांत पडून असलेला कापूस,मका,आणि ज्वारी लवकरात-लवकर हमी भावाने पूर्णपणे खरेदी करून दिलासा द्यावा.
४) शेतकऱ्यांना युरिया सह तत्सम रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा करण्यात यावा.
५) शेतकऱ्यांचे ताळेबंदी मधील तीन महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे.
तरी वरिल सर्व मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी आग्रही मागणी आम्ही करीत आहोत असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील,कृ. उ.बा.समिती सभापती सतिष शिंदे,पं.स.सभापती वसंत गायकवाड,शहराध्यक्ष रमेश वाणी,जि.प.सदस्य मधुकर काटे,पं.स.सदस्य बन्सीलाल पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,नगरसेवक विष्णु अहिरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष कांतीलाल जैन सरचिटणीस राजेश संचेती,सुनिल पाटील सर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,राहुल गायकवाड,भैया ठाकूर,आदी उपस्थित होते.









