नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काठावरचे बहुमत मिळवत मध्यप्रदेशात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिले आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने 19 आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. या घडामोडी घडत असताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.पीएमओला उद्देशून राहुल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात की, मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात मोदीजी तुम्ही पेट्रोल-डिजेलच्या दरात जागतीक पातळीवर 35 टक्क्यांनी झालेली घसरण विसरून गेला आहेत. भारतात पेट्रोल-डिजेलचे दर 60 रुपयांपेक्षा कमी करून दर कोसळण्याच्या भारतीयांना फायदा मिळवून द्याल का, असा सवाल राहुल यांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच इंधनाचे दर कोसळल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असंही राहुल यांनी म्हटले.