राम नगर येथील घटना ; ५२ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरातील एमआयडीसी परिसरातील राम नगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी घरामध्ये प्रवेश करून कपातील दागिने आणि रोकड असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी शेख सद्दाम अब्दुल वहाब वय 28 वर्ष धंदा फेब्रिकेशन (हातमजुरी) रा, गल्ली नं. १ रामनगर मेहरूण, जळगाव येथे पत्नी आयशाबी शेख सद्दाम हिच्यासह भाड्याने राहतात. घरासमोरच माझे सासरे शेख कलीम शेख वजीर हे देखील समोर राहतात. शेख सद्दाम अब्दुल वहाब यांची बहीण नसीमबी सलिम शेख वय 55 वर्ष रा. चोपडा के. जी.एम काँलनी चोपडा ता. जि. जळगाव ही सुमारे 1 महिन्यापासून आली होती तिचे दागिने व पैसे असलेली कापडी पिशवी तिने कपाटात ठेवण्यासाठी दिली होती.
१७ रोजी आयशा ही घरी एकटीच होती . ती देखील दुपारी २ वाजता घराला कुलुप लावुन घरासमोर राहणाऱ्या शेख कलीम शेख वजीर यांचेकडे बसायला गेली होती.सायंकाळी शेख सद्दाम घरी आलो तेव्हा घराला लावलेले कुलुप तुटून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. अज्ञात व्यक्तीने
३०हजार रु.रोख रक्कम १२ हजारांचे ४ ग्रँम कानातील रिंग १० हजार किंमतीची ५ ग्रँम गळ्यातील पांचाली असा एकूण ५२ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







