यावल (प्रतिनिधी) – शहरातील फालकनगरात १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली तिने आत्महत्या करण्याचे कारण लगेच समजू शकले नाही. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल शहरातील फालकनगरात राहणारी पुजा भैरवलाला प्रजापती (वय-१९) ही तरूणी कुटुंबियांसह राहते. पुजाने रात्री कुटुंबियांसह जेवण करून झोपली होती मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना घराच्या छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेवून तिने आत्महत्या केली. आज सकाळी ७ वाजता वडील भैरवलाल प्रजापती उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. भैरवलाल प्रजापती यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भैरवलाला प्रजापती ३५ वर्षांपासून यावल शहरात भेलपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. ते मुळ रहिवाशी सेतवाणा ( जि. चित्तोडगड , राजस्थान) येथील आहेत .या तरूणीने गळफास घेण्याचे कारण लगेच समजू नाही. पुढील तपास पो.कॉ. नेताजी वंजारी करीत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आाले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला